Best 170+ प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी मुख्य सामग्रीवर वगळा

Best 170+ प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी



प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी - आज आम्ही तुमच्यासाठी खास प्रेरणादायक सुप्रभात संदेश, Heart Touching Positive प्रेरणादायक सुप्रभात संदेश आणि Morning Quotes In प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी ची आकर्षक अशी वाक्ये आणि फोटो संग्रह घेऊन आलो आहोत. जे तुमच्या दैनंदिन जीवनाकरिता खूप फायदेशीर ठरतील.  मला खात्री आहे कि हे प्रेरणादायी सुप्रभात संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही आपल्या मित्रांना शेअर कराल. 

चला तर मग सुरु करूयात प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी चा प्रवास.



प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी 2024


प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-2024


मित्रानो ,"प्रेरणा" ही आपल्या जीवनातील अशी शक्ती आहे, जी आपल्याला प्रत्येक अडचणी आणि आव्हानांना न जुमानता सतत पुढे जाण्याची ताकद देते. 

जेव्हा आपण खचून जातो किंवा आपल्या ध्येयापासून दूर जाऊ लागतो, तेव्हा हेच प्रेरणादायी विचार आपल्याला नवीन ऊर्जा आणि नवी दिशा देऊन जातात. 

ते आपल्याला आठवण करून देतात की आपण कमजोर नाही आहोत, जीवनात कितीही संकट आले तरीही आपण हार मानायची नाही.  

म्हणूनच तुमच्यासाठी "प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी" वाक्यांचे आणि फोटोचे Collection  घेऊन आलो आहोत जे तुम्हाला प्रेरित करतील आणि तुम्ही सकारात्मक राहाल; आणि आपल्या मित्र-मंडळींना एक सकारात्मक प्रेरणादायक सुप्रभात संदेश देऊन दिवसाची एक छान सुरुवात कराल.


प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-0


अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे 
ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .

अन्न म्हणजे देव आहे, 
म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

अपराध करून जो सुख मिळवतो 
त्याला देव कधीही क्षमा करत नाही.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-2



अभ्यासामुळे आनंद वाढतो, 
भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.


आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे 
आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.


आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा 
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.


एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, 
हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो 
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.


कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; 
भक्ती म्हणजे सेवाभाव.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-3




केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा 
ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.


खोटी टीका करू नका, 
नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.


चारित्र्याचा विकास घडविते, 
तेच खरे शिक्षण.


जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात, 
तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळतात.


जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, 
तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.


प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-4



जितके निरीक्षण सुक्ष्म,तितकी समजूत अधिक, 
म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.


जो दुसऱ्यांना देतो 
त्याला देव देतो.


ज्ञान हाच सर्व सामाजिक व 
राजकीय क्रांतीचा पाया आहे.


ज्ञानात मिळते तेवढे परम सुख 
अन्य कशातही नाही.


ज्याचं मन सदा धर्मरत राहतं, 
त्याला देवदेखील नमस्कार करतो.


ज्याचे मन निरंतर धर्मरत असते 
त्याला देव देखील नमस्कार करतो.


प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-5



ज्याच्यामधे मानवता आहे 
तोच खरा मानव !


टाकीचे घाव सोसल्याशिवाय 
देवपण मिळत नाही.


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल 
तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.


तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, 
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.


तुलना करावी पण 
अवहेलना करू नये.


थोरांचे सदगुण घेणे हीच 
त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली!



Heart Touching Positive प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी




heart-touching-positive-प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी



प्रत्येक सकाळ हि आपल्या जीवनात नवीन संधी घेऊन येते. जेव्हा आपण सकाळी आपले डोळे उघडतो तेव्हा आजच्या आपल्या दिवसासाठी नवीन आशा, विचार असतात कि आज आपण काय-काय करायचे वगैरे..
अशा परिस्थितीत, Heart Touching Positive प्रेरणादायक सुप्रभात संदेश देऊन आपल्या दिवसाची सुरुवात आणखी सुंदर करू शकतो.
हा संदेश आपल्याला केवळ चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा देत नाही तर जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन आशा आणि एक नवीन दिशा घेऊन येतो याची आठवण करून देतो.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-6



दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर
मूर्ती बनवली तर लोक
त्यावर डोके टेकतात.



दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात

प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.



देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे

म्हणजेच ईश्वराची सेवा होय.



दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही

आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडील

अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.



धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे.

यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.





प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-7




नम्रता हा माणसाचा 
खरा दागिना आहे.


निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, 
बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.


परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे 
त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.


परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच 
साहाय्य करतो.


परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो 
जो अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो 
त्याला ती निश्चित पणे मिळत असते.






प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-8




परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय 
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.


पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून 
आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.


पैशाचा प्रश्न आला की, 
सर्वजण एकाच धर्माचे होतात.


प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, 
तर गती हा त्याचा आत्मा आहे.


प्रयत्न हा परमेश्वर.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-9




प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक, 
शरीराला जेवढे आवश्यक आहे, 
तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.



प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या 
जवळ जाण्याची शक्ती.



प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.



प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक.



प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित होऊन केलेले 
आत्मसमर्पण होय.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-10




फळाची अपेक्षा करुन 
सत्कर्म कधीच करु नये.


बालमनाची कळी 
प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु.


बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे, 
बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच आहे.


बोलून विचार करण्यापेक्षा 
बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा.


बोले तैसा चाले, 
त्याची वंदावी पाऊले !




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-infographic






?प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-1
?प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी






प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-11



भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते. 
पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका. 
परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.


मनाचा लय झाल्यावर परमानंदाचा अनुभव येतो 
व हे योगसाधना केल्यावरच शक्य होते.


महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात 
त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.


मुलांच्यात बदल हाच 
शिक्षकाचा आनंदाचा ठेवा!


मुले म्हणजे नवजगाची आशा 
उद्याचे जग बनविणारी थोर शक्ति म्हणजे मुले.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-12



वाचन, मनन आणि लेखन 
म्हणजे अध्ययन.


विद्येवाचून मान नाही, विद्येवाचून द्रव्य नाही अन्‌ 
विद्येवाचून मनुष्यपण ही नाही.


वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भूर्जपत्रावर 
लिहिलेली काव्ये होत.


शाळा हे समाजाने, 
समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले 
एक संस्कार केंद्र आहे.


शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-13



श्रध्दा असली की 
सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.


सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.


स्वप्न आणि सत्य यात 
साक्षात परमेश्वर उभा असतो.


स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा 
हीच खरी प्रार्थना.


हे देवा, 
मला खूप खूप आव्हानं दे व 
ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-14



माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर 
त्याला ठेवायला जागा लागते,
तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की 
बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण 
कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं 
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं.




जर तुम्ही धर्म कराल, 
तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, 
आणि जर तुम्ही कर्म कराल 
तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..




आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी 
'रामाचा आचार', 
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..



प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे 
तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.


प्रार्थना म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याची शक्ती.

 


प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-15




दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, 
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.



जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका 
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, 
कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.



देवावर विश्वास असेल तर, 
देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, 
स्वतःवर विश्वास असेल तर, 
देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.

 

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा 
वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

 

पुस्तकाने माणसाच मस्तक सशक्त होत… 
सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत… 
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत …!



Morning Quotes In प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी




morning-quotes-in-प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी



आम्ही तुमच्यासाठी Morning Quotes In प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला प्रेरणादायक संदेश बघायला मिळतील.


प्रेरणादायक सुप्रभात संदेश आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने आपण प्रत्येक अडचणीचा सामना करू शकतो.


जेव्हा आपण दिवसाची सुरुवात प्रेरणादायक सुप्रभात संदेशाने करतो, तेव्हा तो संदेश आपल्याला संपूर्ण दिवस ऊर्जा, उत्साह आणि दृढनिश्चयाने भरतो.


अगदी साधा "गुड मॉर्निंग शुभेच्छा संदेश" देतो तेव्हा त्यात आपल्या मनातील भावना आणि सकारात्मकता असते आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देते.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-16




श्रद्धेची मुले हृदयात असतात, 
जिभेच्या टोकावर नसतात.



आपण जेव्हा वयाने मोठे होतो 
तेव्हा आपल्याला काळात कि आपल्याकडे दोन हात आहेत, 
एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि 
दुसरा इतरांना मदत करण्यासाठी.



तुम्ही
आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.

पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते, 
आणि मनाला बंध घातला तर "संत" होतात.
  

मी देव मानतो पण माणसात राहणारा.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-17




प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले 
वायरलेस कनेक्शन आहे.



अनोळख्याला भाकरी द्यावी, 
पण ओसरी देऊ नये.


आयुष्य जगून समजते; 
केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.



आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.



आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, 
त्याने जगणे बाजूला राहून जाते. 
जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि 
मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-18




आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर सोबती कुणाची तरी
हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते.



आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.



आयुष्यात अनेक संधी चालून येतात. 
आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. 
या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. 
नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे.



आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे 
तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.



आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा 
काय कमावलंत ह्याचा विचार करा.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-19



आयुष्यात काही करून दाखवायचे असेल 
तर आपण काय आहोत? 
यापेक्षा आपण काय होऊ शकतो 
याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.



आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.



आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; 
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते 
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.




आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका
की जणू जिंकायची सवयच आहे.
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!



आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त 
एक टक्का आणि परिश्रमाचा भाग 
नव्याण्णव टक्के असतो.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-20




आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.



आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.



आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.



आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.



आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.






प्रेरणादायी प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी




प्रेरणादायी-प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी



येथे तुमच्यासाठी "प्रेरणादायी प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी" Collections घेऊन आलो आहोत ज्यात प्रेरणादायी वाक्य आहेत जी तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करतील.


“प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येते, जिथे आपण आपल्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी विचारांनी केली तर आपला संपूर्ण दिवस सकारात्मक होतो. "प्रेरणादायी प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी" आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही आव्हाने असली तरीही, हे संदेश आपल्याला पुढे जाण्यासाठी धैर्य आणि सकारात्मक दृष्टीकोन देतात.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-21



आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी 
क्रोधाचे गुलाम बनू नका.



एक साधा विचारसुध्दा 
तुमचं आयुष्य उजळवू शकतो 
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.



एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो 
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.



कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..



कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. 
ते मिळवावे लागतात.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-22



खूप कमी लोक आपल्या आयुष्यात 
सुख आणि आशीर्वाद घेवून येतात...
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव 
आणि शिकवण देण्यासाठी येतात…



छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.



जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि 
ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.



जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, 
समुद्र गाठायचा असेल, 
तर खाचखळगे पार करावेच लागतील.



जीवन ही एक जबाबदारी आहे. 
क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.



ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही 
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. 
आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, 
तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-23



तडजोड हे आयुष्याचं 
दुसरं नाव आहे.


तारूण्य म्हणजे जीवनाचा 
रचनाकाळ आहे.


तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली 
यावरुन तुमची श्रीमंती कळते.


तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा 
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.


नेहमी तत्पर रहा; 
बेसावध आयुष्य जगू नका.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-24




परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.



पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुश्य म्हणतात.



पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, 
एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.



भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, 
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण 
आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.



माणसाने आपल्या आयुष्यात 
सुख-दुःख, मानापमान, स्फूर्ती-निंदा, 
लाभ हानी, प्रिय-अप्रिय 
ह्या गोष्टी समान समजाव्यात.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-25



माणसाला "बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात.
पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.



लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.



विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.



शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.



संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.




प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी Text




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-text



येथे तुमच्यासाठी "प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी Text" चे Collection घेऊन आलो आहोत जिथे तुम्हाला प्रेरणादायी वाक्य Text स्वरूपात पाहायला मिळतील जी तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.


जेव्हा आपला दिवस सकारात्मक विचाराने सुरू होतो, तेव्हा आपल्याला आपल्या ध्येयांकडे जाण्याची वाटचाल मिळते. हे प्रेरणादायक सुप्रभात संदेश आपल्यातला आत्मविश्वास जागृत करतात आणि आपल्याला अडचणींना सामोरे जाण्याचे बळ देतात.



प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-26



सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे 
हा योगा-योग आहे, 
परंतु सज्जन म्हणून मरणे, 
ही आयुष्य भराची कमाई आहे.



समाधानी राहण्यातच आयुष्यातलं 
सगळ्यात मोठं सुख आहे.



सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये.



सुरुवात कशी झाली यावर 
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.



"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, 
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."



वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.
कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधी पण परत येत नाही.
असेच वेळेचे पण आहे.
एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा
आनंद लुटा…



आयुष्य कोणासाठी थांबत नाही 
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.

 

जीवनाचे दोन नियम आहेत, 
बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते 
आणि कुणाकडून प्रेम मिळवणं 
सर्वात मोठा सन्मान असतो.....!



गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, 
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, 
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…



नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण 
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात़


सुख आहे सगळ्यांजवळ पण 
ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे 
बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत 
आज जगायलाच वेळ नाही.


फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. 
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. 
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. 
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.




प्रेरणादायक-सुप्रभात-संदेश-मराठी-27




जगू शकलात तर चंदनासारखे जगा; 
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.



इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं 
पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात 
तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.



ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. 
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. 
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय 
जीवन आंधळे आहे.



"आयुष्य खूप साधं असत. 
कधीकधी खूप रटाळ असत.
आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. 
श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत. 
प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या 
सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे."




मरण अखेर येतंच हे 
स्वतःपुरत 
खरं कसं मानायचं
आता आपण नाही हे 
मेलेल्याने 
सांगा कसं जाणायचं ? 



शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान 
हे परीक्षा देताना समजत 
आणि शब्दांच जीवनाशी काय नात असत 
ह्याचा अर्थ जगताना समजतो. 
परीक्षेचा होंल सोडला कि 
परिक्षेच ओझ झटकता येत, 
कारण पदवीपुरता त्या होंलशी संबंध असतो. 
पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत 
तेव्हांच त्यांचा खरा अर्थ समजतो. 




'तडजोड' म्हणजे सुखी आयुष्याचा 'पासवर्ड'




'ज्योत' म्हटलं की ती झंझावातात विझणारच 
असं मानलं जातं. 
सगळ्याच ज्योती विझतात. 
विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. 
आणि ज्योतीचा जय होणार नाही कशावरून ? 
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, 
झंझावातालाही असतं.



पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल 
पण लयलूट करायची ती सुगंधाचीच .....



“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात 
स्वता:चं स्वता:पण हरवून बसतो ..”



"तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; 
पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही 
तरी त्याला कधीही क्षमा करू नका 
आणि तुमचं भरून न येणारं ,
आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य 
दुसऱ्या माणसाकडून झालं, 
पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, 
उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर 
त्याला मोठ्या मनानं क्षमा करा"



"आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला 
प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका ... 
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात 
तुम्हाला काही महत्व उरत नाही"





Conclusion


प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी" ने दिवसाची सुरुवात केल्याने आपले मनोबल वाढेलच
पण जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टीकोन देखील मिळेल.


ह्या Post लिहण्यामागचा हाच हेतू होता कि आपण नेहमी सकारात्मक राहिले पाहजे. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याच वेळी नैराश्यपणा पाहायला मिळते.
तुमच्या जीवनात सकारात्मकता राहावी ह्यासाठीच हा छोटा प्रयत्न.

I hope तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच कंमेंट करा..शेअर करा..
तुमचे साकारात्मक राहण्याबाबत काय विचार आहेत हे जाणून घ्यायला मला फार आवडेल तर नक्की Comment करा.


FAQ



१) प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी काय आहेत?
उत्तर - प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी हे असे विचार आहेत जे आपले मन सकारात्मकतेने आणि उत्साहाने भरून आपल्याला दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने सुरु करण्यास प्रवृत्त करतात.

२) प्रेरणादायक सुप्रभात संदेशांचा जीवनावर काय परिणाम होतो?
उत्तर - हे प्रेरणादायक संदेश आपले मानसिक आरोग्य सुधारतात, आत्मविश्वास वाढवतात आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक वृत्तीने सुरु करण्यास मदत करतात.

३) मी प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी कसे निवडू?
उत्तर - तुमच्या वर्तमान स्थितीशी किंवा मनःस्थितीशी जुळणारे प्रेरणादायक संदेश निवडा आणि तुम्हाला तुमच्या ध्येयांसाठी प्रवृत्त करण्यात मदत करा.

४) मी हे संदेश इतरांना पाठवू शकतो का?
उत्तर - होय, मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी शेअर करून त्यांचा दिवस सकारात्मक आणि प्रेरणादायी बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

५) हे संदेश खरोखरच जीवन बदलू शकतात का?
उत्तर - होय, सतत प्रेरणा आणि सकारात्मक विचार केल्याने आपली विचार करण्याची पद्धत बदलू शकते आणि जीवनात मोठा बदलघडताना तुम्ही नक्कीच बघू शकाल.
हे संदेश आपल्याला दिवसाच्या आव्हानांचा सामना करण्यास आणि यशाकडे जाण्यास मदत करतात.





Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan |

   शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan | नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत " शुभ सकाळ आठवण " चा खास संग्रह.  ज्या मध्ये तुम्हाला शुभ सकाळ आठवण सोबतच शुभ सकाळ आठवण स्टेटस, शुभ सकाळ सुविचार मेसेज अशा प्रकारचे सुंदर सकाळच्या शुभेच्छा संग्रह पाहायला मिळेल.  चला तर मग सुरु करूयात. 

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.  सकाळच्या शुभेच्छांमध्ये जर प्रेमाचा स्पर्श असेल, तर त्या नात्याला आणखी गोडवा मिळतो.  यामध्ये तुम्हाला Heart Touching Good Morning Quotes Marathi Love, Love Good Morning Quotes Marathi Love, Good Morning Quotes Marathi Love Shayari,  आणि Relationship Good Morning Quotes Marathi Love असे खास कलेक्शन मिळतील.  तुमच्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.  

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

   Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?  | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi |  Lagnachya shubhechha in marathi sms  | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband  |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |