Best 80+ Marathi सुंदर सकाळ SMS Collection 2024 मुख्य सामग्रीवर वगळा

Best 80+ Marathi सुंदर सकाळ SMS Collection 2024


सुंदर सकाळ SMS — आम्ही तुमच्यासाठी खास, आकर्षक सुंदर संदेश आणि सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा चा वाक्य आणि फोटो संग्रह आणला आहे.

आधीच्या काळात आपण आपल्या मित्र-मंडळींना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा देण्याकरता रोज सकाळी SMS च्या माध्यमातून शुभेच्छा देत असायचो; परंतु  बदलत्या  काळानुसार आजकाल  ह्याच  शुभेच्छा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लोकांना देत असतो.

पण अजूनही काही लोक आहेत जे आजही त्याच जुन्या दिवसांना, जुन्या आठवणींना Miss करतात. म्हणूनच आम्ही त्या आठवणींना पुन्हा जागं करत हे सुंदर सकाळ SMS चे Text आणि फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मला खात्री आहे तुम्हाला हे नक्कीच आवडतील. 

चला तर मग सुंदर सकाळ SMS च्या आठवणी जाग्या करूयात.

  • मुलीला गुड मॉर्निंग टेक्स्ट केल्यानंतर काय बोलावे?

उत्तर-  मुलीला गुड मॉर्निंग टेक्स्ट केल्यानंतर तिला म्हणावे कि " सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, तुझा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदित जावो."
तुमच्या ह्या एवढ्या वाक्याने तुम्हाला तिच्याबद्दलची  असलेली आपुलकीची भावना तिला दिसून येईल, आणि ती सुद्धा तुम्हाला सुंदर शुभेच्छा नक्कीच देईल. 

एक प्रेमळ सुप्रभात संदेश काय आहे?

उत्तर- "उगवत्या सूर्याच्या प्रकाश तुमच्या आयुष्यात एक नवा जोश आणि एक नवी उमेद, प्रेरणा घेऊन येवो आणि सोबतच सकारात्मक विचारांनी सुरुवात करून तुमचा दिवस आनंदित जावो, शुभ सकाळच्या खूप खूप शुभेच्छा."
अशा शुभेच्छा आपण नक्कीच देऊ शकतो.. अधिक माहिती करता ह्या ब्लॉग मध्ये विविध सुप्रभात संदेश चे Collection तुम्हाला पाहायला मिळेल. 


सुंदर सकाळ SMS


सुंदर-सकाळ-sms-1

मित्रानो येथे आम्ही सुंदर सकाळ SMS हे Text स्वरूपात आणि फोटो स्वरूपात Design केले आहेत जे तुम्ही Copy करू शकता; आणि Images तुमच्या Mobile मध्ये Save करू शकता. 


जीवन हे 
यश आणि अपयश 
यांचे मिश्रण आहे...


आयुष्य हे वहीतील पानांसारखंअसतं..!
रिकामं तर रिकामं, 
लिहिलं तर छानअसतं...!
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्मअसतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,कुठलंच
पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढेशिकायचं असतं.....!


रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही 
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच, 
आपले जीवनही पुसले जाणार आहे 
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात. 
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. 
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं....


जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 
1) विश्वास
2) वचन
3) नाते 
4) मैत्री 
5) प्रेम 
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....
 


सुंदर-सकाळ-sms-2


ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.


आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।


कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे
झालो. कारण तुटलेली मनं
आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी 
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता...


" एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , 
ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , 
त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , 
तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी 
दुसऱ्या स्वप्नामागे धावण, 
हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . 
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ” 


आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन . 
आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी 
माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन .


सुंदर-सकाळ-sms-3


पायाला पाणी न लागता पण 
कुणी समुद्र पार करू शकतो 
पण माणसाचे आयुष्य 
अश्रू शिवाय पार करता येत नाही 
यालाच खरे आयुष्य म्हणतात . 


आयुष्य हि फार अवघड शाळा आहे 
आपण कोणत्या वर्गात आहोत 
हे आपल्याल ठाऊक नसत 
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते 
आणि कॉपी करता येत नाही 
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .


आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…. 
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.. 


आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं ..


ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य 
मनमोकळेपणाने जगलात 
तोच दिवस तुमचा आहे 
बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत..


सुंदर-सकाळ-sms-4



सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा 


सुंदर-शुभ-सकाळ-शुभेच्छा


मित्रानो येथे आम्ही सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा संदेश  हे Text स्वरूपात आणि फोटो स्वरूपात आणले आहेत जे तुम्ही Copy करू शकता; आणि फोटो तुमच्या फोन मध्ये Save करू शकता.


सुंदर-सकाळ-sms-5


तुम्ही किती जगता यापेक्षा 
कस जगता याला जास्त महत्व आहे...


समाधानी राहण्यातच आयुष्यातील 
सर्वात मोठ सुख आहे..


आयुष्यातील कोणत्याही क्षणी 
क्रोधाचे गुलाम बनु नका.. 


आयुष्यात सगळ्याच गोष्टी 
आपल्याला जमतील असं नाही.


आयुष्यात सर्वात जास्त विश्वास 
परमेश्वरावर ठेवा.



सुंदर-सकाळ-sms-6


आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे 
तर कुणासाठी एक खेळ आहे 
आणि कुणासाठी एक शोकांतिका..


तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!


आयुष्यात 'चुकीची व्यक्ती' 
आपल्याला 'योग्य धडा' शिकवते, 
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते..


जो दुसर्यांना आधार देतो 
त्याला कोणचं आधार देत नाही.
 

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो 
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, 
कारण "आपल्या माणसांबरोबर" 
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!


सुंदर-सकाळ-sms-7


"जीवनातिल कडवे सत्य" 
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"... 
आणि... 
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!


आयुष्य हे असच जगायचं असत 
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा 
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा 
जग अपोआप सुंदर बनत..


जीवन सर्वांसाठी सारखच असते, 
फरक फक्त एवढाच असतो,
"कोणी मनासारखं जगत असतं तर
 कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं"…!!


केवळ ज्ञान असून उपयोग नाही, 
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.


यश न मिळणे याचा अर्थ 
अपयशी होणे असा नाही.


सुंदर सकाळ

 
सुंदर-सकाळ


मित्रानो, सकाळची सुरुवात एका छान विचाराने होउदे असं प्रत्येकालाच वाटत असते. आपला दिवस सुंदर जाण्यासाठी काही सकारात्मक सुंदर सकाळ संदेश आणले आहेत जे तुम्ही Copy करू शकता; आणि फोटो तुमच्या फोन मध्ये Save करू शकता. 


कष्ट इतक्या शांततेत कराव कि 
यश धिंगाणा घालेल..
 

प्रप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद 
अधिक असतो..
 

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर 
जो इमारत उभी करू शकतो 
तो खरा यशस्वी माणूस..


वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, 
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, 
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते..


छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... 
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... 
कारण... 
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... 
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!


सुंदर-सकाळ-sms-8



रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु
स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो...
नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला
बदलणारा एखादाच असतो.....
जिंकणारे बरेच असतात पण 
हरून जिंकणारा एखादाच असतो....!


पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण.... 
जिंकला तर.... स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, 
आणि...
हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . .


यशाची ऊंची गाठताना 
कामाची लाज बाळगू नका 
आणि कष्टाला घाबरू नका. 


नशिब हे लिफ्टसारखं असतं. 
तर कष्ट म्हणजे जिना आहे. 
लिफ्ट कधीही बंद पडू शकते. 
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी 
वरच घेऊन जात असतो...


आपल नशिब आपण 
स्व:तह उजळवयाच असत. 



सुंदर-सकाळ-sms-9



जेव्हा आपण मेहनत करु 
तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल. 
अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. 
प्रयत्नांशी परमेश्वर....! 


।। यशस्वी माणुस तोच होतो 
ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले 
तरी तो त्याचा सरबत करून पितो...!!


 काही मिळाले किंवा नाही मिळाले... 
तो नशिबाचा खेळ आहे... 
पण, प्रयत्‍न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल...


परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, 
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो..


ज्याने स्वतःच मन जिंकलं 
त्याने जग जिंकलं..



सुंदर-सकाळ-sms-10


सुंदर संदेश 


सुंदर-संदेश


मित्रानो, जेव्हा आपण सकाळची सुरुवात एका सकारात्मक विचाराने करतो तेव्हा आपला संपूर्ण दिवस सुद्धा सकारात्मक आणि आनंदित जातो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी खास प्रेरणादायी सुंदर संदेश फोटो च्या माध्यमातून आणले आहेत जे तुम्ही तुमच्या फोन मध्ये Save करू शकता. 



सुंदर-सकाळ-sms-11



सुंदर-सकाळ-sms-12



सुंदर-सकाळ-sms-13



सुंदर-सकाळ-sms-14



सुंदर-सकाळ-sms-15



सुंदर-सकाळ-sms-16



सुंदर-सकाळ-sms-17



सुंदर-सकाळ-sms-18



सुंदर-सकाळ-sms-19



सुंदर-सकाळ-sms-20


सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा


सुंदर-सकाळच्या-सुंदर-शुभेच्छा


मित्रानो, आपण दिवसाची सुरुवात आपल्या जिवलग मित्रांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा देऊनच करतो. म्हणूनच आज खास तुमच्यासाठी सुंदर सकाळ च्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. या शुभेच्छा तुम्ही Copy करू शकता व सोबतच फोटो  तुमच्या फोन मध्ये Save करून आपल्या मित्र-परिवाराला पाठवू  शकता.   


जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर ...
 तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल ...


तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न 
सत्यात येण्यापासून रोखू शकते ती म्हणजे 
'अपयश येण्याची भीती'


भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच 
भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. 
म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते. 
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात. 


निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे 


"निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही. 
निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. 
चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे. 
परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही 
त्याचं मन नेहमी हे करू की ते करू ह्या गोंधळात गुंतलेलं असतं. 
मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकिवात नाही. 
ज्याला निर्णय घेता येत नाही. आणि ज्याला कृती करता येत नाही. 
त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही."


सुंदर-सकाळ-sms-21


"यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं"


"आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं 
कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय"


तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो


"आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात 
तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, 
त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . 
असच माणसाचं आहे.......
समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. 
पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की 
आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते."


यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. 
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. 
यश आणि सुख जोडीने येतात. 
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि 
जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.


सुंदर-सकाळ-sms-22


आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर 
याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. 
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. 
सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.


सकारात्मक  विचारांची उंची वाढवा 
आणि निश्चित ध्येय गाठा


दिवा मातीचा आहे की सोन्याचा 
हे महत्वाचं नसून तो 
अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे


ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि 
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल....


एकत्र येणे ही सुरवात, 
एकामेकांसोबत राहणे ही प्रगती 
आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....


सुंदर-सकाळ-sms-23



Conclusion 

हे होते सुंदर सकाळ SMS चे खास Collections जे आम्ही तुमच्यासाठी Design केले होते. तुम्हाला हे संदेश कसे वाटले ?


आज आपण भले WhatsApp , Facebook आणि विविध माध्यमातून सुंदर शुभ सकाळच्या शुभेच्छा  देतो पण मित्रांना SMS करून सकाळची शुभेच्छा पाठवण्यात एक वेगळीच मजा आहे. 


मला विश्वास आहे कि तुम्ही सुद्धा तुमच्या Life  मध्ये Atleast एक दिवस तरी Social मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यापेक्षा आपल्या लाडक्या मित्रांना SMS च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा नक्की द्याल. 


FAQ

१. सकाळचे सर्वोत्तम सुंदर सकाळ संदेश कोणते आहेत?

उत्तर: सर्वोत्तम सुंदर सकाळचे संदेश ते आहेत जे तुमच्या हृदयातून येतात. सकारात्मकता, प्रोत्साहन आणि उत्साहाने भरलेले परिपूर्ण संदेश आहेत. तुम्ही तुमच्या संदेशात काही प्रेरणादायी सुप्रभात संदेश मराठी जोडल्यास ते अधिक आकर्षक होईल.


२. मी माझ्या मित्रांना सुंदर सकाळच्या संदेशांसह फोटो पाठवू शकतो का?

उत्तर: होय! सुंदर सकाळच्या संदेशांसह फोटो पाठवणे ते अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवते. तुम्ही एका सुंदर फोटोसह एक वैचारिक संदेश पाठवून तुमच्या  मित्राचा दिवस उज्ज्वल करू शकता .


३. मी दररोज सुंदर सकाळचे संदेश पाठवू शकतो?

उत्तर: होय नक्कीच! तुम्हाला दररोज सुंदर सकाळचे सुंदर संदेश हे तुमच्या मित्रांना पाठवू शकता. असे सुंदर संदेश पाठवून त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने  सुरू करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 


Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan |

   शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan | नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत " शुभ सकाळ आठवण " चा खास संग्रह.  ज्या मध्ये तुम्हाला शुभ सकाळ आठवण सोबतच शुभ सकाळ आठवण स्टेटस, शुभ सकाळ सुविचार मेसेज अशा प्रकारचे सुंदर सकाळच्या शुभेच्छा संग्रह पाहायला मिळेल.  चला तर मग सुरु करूयात. 

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.  सकाळच्या शुभेच्छांमध्ये जर प्रेमाचा स्पर्श असेल, तर त्या नात्याला आणखी गोडवा मिळतो.  यामध्ये तुम्हाला Heart Touching Good Morning Quotes Marathi Love, Love Good Morning Quotes Marathi Love, Good Morning Quotes Marathi Love Shayari,  आणि Relationship Good Morning Quotes Marathi Love असे खास कलेक्शन मिळतील.  तुमच्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.  

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

   Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?  | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi |  Lagnachya shubhechha in marathi sms  | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband  |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |