Marathi Quotes On Love
प्रेम हा आपल्या आयुष्यातला नाजूक आणि गोड धागा आहे जो दोन मनं जुळवत नाही तर दोन हृदय जोडतो. 'Marathi Quotes On Love' हे अशा Quotes चा संग्रह आहे, जो तुमचं प्रेम साध्या व प्रभावशाली पद्धतीने व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग प्रदान करतो.
प्रेमाला शब्दांत बांधणं कठीण असलं तरी या Quotes मुळे तुमच्या भावना अगदी सहज व्यक्त करता येतात. हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असलेले हे Marathi Love Quotes तुमच्या प्रिय व्यक्तीच्या हृदयाला थेट भिडतील. हे Quotes केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठीच नाहीत, तर तुमच्या नात्यामधला गोडवा वाढवण्यासाठीही उपयुक्त आहेत. प्रेमाच्या या सुंदर क्षणांना खास बनवण्यासाठी हे Quotes नक्कीच उपयोगी ठरतील.
प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.
पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे.
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते…
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.
 |
Marathi Quotes On Love |
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…
फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..
तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल…
आज परत तुझ्या आठवणीने
दर्द ए गम ची धुंद मनाला छ्ळु
लागलीय..आज परत तुझी आठवण
हृदयाचे ठोके चुकवू लागलीय..
 |
Marathi Quotes On Love |
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन
आठवण तरंगते डोळ्याशी.
प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला…
मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;”
जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल
 |
Marathi Quotes On Love |
लव शायरी मराठी - तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास Love Shayari Marathi
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.
 |
Marathi Quotes On Love |
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.
Short Marathi Quotes On Love
कधीकधी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फार मोठ्या शब्दांची गरज नसते. 'Short Marathi Quotes On Love' हे Quotes प्रेम व्यक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत. ह्यामधील छोटे, गोड आणि अर्थपूर्ण असणारे हे Quotes तुमच्या प्रेयसी/ प्रियकराच्या हृदयात खोलवर रुजतील. हे Quotes केवळ काही थोडक्याच शब्दांमध्ये तुमचं प्रेम व्यक्त करण्याची ताकद ठेवतात.
तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास Quotes पाठवण्याचा विचार करताय? मग हे छोटे पण प्रभावी कोट्स तुमच्यासाठी योग्य ठरतील. नात्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या क्षणांना हा Quotes आणखी खास बनवतील.
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.
 |
Short Marathi Quotes On Love |
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.
 |
Short Marathi Quotes On Love
|
ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?
असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.
तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला.
 |
Short Marathi Quotes On Love
|
Life Status Marathi | जीवनावर मराठी स्टेटस खास तुमच्यासाठी |
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
Shayari Marathi Quotes On Love
आपलं प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे शायरी. 'Shayari Marathi Quotes On Love' या संग्रहात अशा शायऱ्या आहेत ज्या तुमचं प्रेम शब्दांमधून प्रभावीपणे मांडतील. ह्यामधली प्रत्येक ओळ तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात घर करून जाते. ही शायरी फक्त शब्दच नाहीत; तर ती तुमच्या मनातली कधी व्यक्त न करता आलेली प्रेमभावना आहे , जे तुमचं नातं अधिक घट्ट आणि सुंदर बनवतो. प्रेमाच्या भावनांना शब्दांत मांडायचं असेल तर या शायऱ्या नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी आहेत.
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.
 |
Shayari Marathi Quotes On Love
|
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
 |
Shayari Marathi Quotes On Love
|
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
 |
Shayari Marathi Quotes On Love
|
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
Marathi Quotes On Love Life
प्रेम आणि आयुष्याचा संगम म्हणजे 'Marathi Quotes On Love Life.' हे Quotes तुम्हाला जीवनात प्रेमाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी मदत करतील. जीवनात प्रेम हे नेहमीच प्रेरणादायी आणि भावनात्मक ठरतं. या Quotes मधून प्रेम आणि जीवन कसं हातात हात घालून चालतं याची सुंदर कथा शायरी स्वरूपात मांडली आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक आव्हानाला तोंड देताना प्रेमाचं महत्त्व अधोरेखित करणारं हे Quotes तुमचं मन नक्कीच जिंकतील.
आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
 |
Marathi Quotes On Love Life
|
जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
 |
Marathi Quotes On Love Life |
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात. कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
 |
Marathi Quotes On Love Life |
जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.
तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.
वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
Marathi Quotes On Love For Him
जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल
प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.
 |
Marathi Quotes On Love For Him |
रोज बोलणारी व्यक्ती
एक दिवस बोलली नाही तर,
अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं.
आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात ..
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.
 |
Marathi Quotes On Love For Him
|
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.
तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
जगावे असे कि मरणे अवघड होइल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!
 |
Marathi Quotes On Love For Him
|
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.”
प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगाव..
आपल्या व्यक्तीवर असलेलं जीवापाड प्रेम व्यक्त करण्यासाठी शायरी सारख्या शब्दांची गरज असते, आणि Marathi Quotes On Love चा संग्रह साध्या आणि सोप्प्या शब्दांमधून तुमच्या प्रेमभावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या संग्रहात दिलेल्या Short Marathi Quotes On Love, Shayari Marathi Quotes On Love, Marathi Quotes On Love Life, आणि Marathi Quotes On Love For Him तुम्हाला तुमचं प्रेम शब्दांमधून व्यक्त करण्यात मदत करतील.
या Quotes चा वापर करून तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या असलेल्या नात्यात आणखी गोडवा आणून तुमच्या नात्याला आणखी मजबूत करू शकता. ह्या Quotes मधला प्रत्येक शब्द हा तुमच्या मनाचा एक भाग आहे, आणि तो जपून आणि मनापासून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा.