आपल्या मनातील दु:ख, प्रेमातील निराशा, आणि आयुष्याचे ताण सहजतेने शब्दात मांडण्यासाठी Marathi Sad Shayari संग्रह तयार केला आहे. या लेखात, तुम्हाला Marathi Sad Shayari सोबत Marathi Sad Shayari Status, Marathi Sad Shayari Love, Marathi Sad Shayari Image आणि Marathi Sad Shayari On Life यांसारख्या विविध विषयांवर अप्रतिम शायरी पाहायला मिळेल.ह्या शायऱ्यांमधून तुमचं दुःख व्यक्त करू शकता.
Marathi Sad Shayari
Sad Shayari आपल्या मनातल्या दुःखी भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. 'Marathi Sad Shayari' हे शब्दांच्या आणि Images च्या माध्यमातून मनातील दुःखद भावना व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग आहे.
या शायरीतून आपल्या मनातल्या वेदना आणि जीवनातील दुःख व्यक्त होईलच तसेच दुःखद भावनांचे मांडलेले शब्द हे मनाला स्पर्श करणारे आणि आपल्या भावना व्यक्त करणारे ठरतील. अशा शायरीचा उपयोग अनेकदा स्वतःच्या वेदना दुसऱ्यांसमोर मांडण्यासाठी केला जातो. प्रेमभंग, एकटेपणा, किंवा जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये या शायरी आपल्या मनातील भावनांना व्यक्त करण्यास मदत करतील.
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण
शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं
पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं
मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो
जर तिला प्रेम आणि पैशांतील फरक
समजला असता
माणसांवर जेवढं प्रेम करावे तेवढे ते दूर जातात.
 |
Marathi Sad Shayari |
लोक म्हणतात एवढं काय असतं प्रेमात,
मी म्हणतो एकदा करून बघा काय नसतं प्रेमात
सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं तापावं लागतं
जखम करणारा विसरून जातो पण
जखम ज्याला झाली तो कधीच विसरत नाही.
 |
Marathi Sad Shayari |
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,
प्रेमाच्या विरहात माझ्या मनात मात्र तो सतत हेलकावत होता
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखाचा हिशोब
अगदी रास्त होता कारण
होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता.
 |
Marathi Sad Shayari |
अजून किती तुकडे करणार आहे या तुटलेल्या मनाचे,
जेव्हा थकशील तेव्हा एवढंच सांग काय चूक होती माझी
आत्मविश्वाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच राहत नाही
जीवनात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक वेळ आणि दुसरे प्रेम…
पण वेळ कोणाचाही नसतो आणि प्रेम सर्वांना मिळेलच असं नाही
काही लोक ठेच लागल्यावर बसतात
तर काही लोक ठेच लागल्यावरच ध्येय गाठतात.
 |
Marathi Sad Shayari |
आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी मिळेल असं नाही
म्हणून मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या
आपल्यामुळे नाही तर कोणीतरी
आपल्यासाठी रडायला पाहिजे
उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे,
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुःख तेवढे वजा आहे
Marathi Sad Shayari Status
सोशल मीडियावर आपल्या मामाच्या दुःखी भावना व्यक्त करण्यासाठी 'Marathi Sad Shayari Status' हा एक प्रभावी मार्ग आहे. हे स्टेटस तुमच्या दुःखाचा अनुभव आणि मनातल्या भावना शायरी स्वरूपात व्यक्त करेल. या शायरीतून एकटेपणा, दुरावलेलं प्रेम, किंवा जीवनातील कठीण प्रसंगांमुळे निर्माण झालेली वेदना व्यक्त होते. ह्या शायरीमधली प्रत्येक ओळ तुमच्या मनातील भावनांना व्यक्त करते आणि इतरांच्या मनालाही भिडते. मित्र, कुटुंबीय, किंवा प्रियजनांसोबत आपल्या दुःखाचा अनुभव शेअर करण्यासाठी हे स्टेटस नक्कीच उपयोगी ठरेल.
जे नशीबात नव्हते तेच मी मागितले,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे
तळमळतो मी इथे तुझ्याविण
शून्य जाहले अवघे जीवन
 |
Marathi Sad Shayari Status |
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
जग कसे असते शेवटी तूच मला दाखवले
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस,
वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का गेलीस
मला माहीत होतं तू मागे वळून पाहशील,
मागे वळून पाहण्याइतकी तू नक्कीच माझी असशील.
 |
Marathi Sad Shayari Status |
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे,
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही,
मी ही म्हणतो मग,
जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही
नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि
वादाच्या रूपाने का होईना पुन्हा भेटण्यासाठी वेळ काढतो
तू समोर असलीच की नुसतं तुला बघणं होतं
आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं.
 |
Marathi Sad Shayari Status |
तू गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं,
तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं
ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले,
पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले
तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काहीच मागत नाही
तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे,
ही माझी कल्पना नाही हा माझा दावा आहे.
 |
Marathi Sad Shayari Status |
इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत
शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत
कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही,
तसं जळण्यास माझी ना नाही,
पण शेवटी काहीच उरत नाही
मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा,
वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयेतेने पाहणारा
नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधीतरी भावनांनाही वाव द्यावा,
आसुसलेल्या डोळ्याना कधी तरी स्वप्नांचा गाव द्यावा
Marathi Sad Shayari Love
प्रेमामध्ये मिळणाऱ्या दुःखी वेदना व्यक्त करण्यासाठी 'Marathi Sad Shayari Love' हा एक उत्तम पर्याय आहे. प्रेमभंगाच्या वेळी मनातील वेदना, तुटलेली स्वप्नं, आणि निराशा व्यक्त करण्यासाठी ही शायरी उपयोगी ठरेल. या शायरीतून आपल्याला प्रेमाच्या आठवणी, एकतर्फी प्रेम, किंवा प्रेमात झालेला दुरावा या सर्व गोष्टींना या शायरीतून भावनिक स्वरूप पाहायला मिळेल; जे तुम्ही तुमच्या व्यक्तीसोबत शेअर करून आपल्या मनातल्या दुःखद भावना व्यक्त करू शकता.
माझ्या हसण्यावर जाऊ नका,
माझ्या रूसण्यावर जाऊ नका,
जरी तुमच्यात मी असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका
मिठी या शब्दात केवढी मिठास आहे,
नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे
रस्ता बघून चल,
नाहीतर एक दिवस असा येईल की
वाटेतील मुके दगडही प्रश्न विचारू लागतील
 |
Marathi Sad Shayari Love |
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही
 |
Marathi Sad Shayari Love
|
तू दिलेल्या दु:खाने मला खूप काही शिकवले
जग कसे असते हे शेवटी मला तूच दाखवले
माझ्या भिजलेल्या
पापण्यांना,
अजून कितीवेळा
पुसू सांगा,
अनं तुझ्यासाठी
मन माझं झुरतं
एकदा तरी तू भावना जाण ना
आज तुला माझ्या असण्याची
किंमत कळत नाहीए
पण एक दिवस असा येईल
तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत 100 टक्के कळेल
 |
Marathi Sad Shayari Love
|
असं ऐकलयं की,श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले पण भेटायला येतात
आजकाल लोकांना
नात्यापेक्षा EGO जास्त महत्वाचा आहे
म्हणूनच एखादं नातं
जास्त काळ टिकत नाही
आयुष्य जगणं
तेव्हा खूप अवघड वाटतं
जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते
कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं
तर हे तुटणारं नातं मी कधीच जोडलं नसतं
 |
Marathi Sad Shayari Love
|
नाते हे मोत्याप्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे
मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी रुसू नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस
जे लोक झुकतात
ते कमजोर नसतात
फक्त त्यांच्यामध्ये
नातं टिकवण्याची क्षमता
इतरांपेक्षा जास्त असते
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली
तर रक्त बाहेर येते
आणि अश्रूंना बाहेर येण्यासाठी
मनाला जखम व्हावी लागते
Marathi Sad Shayari On Life
आपल्या आयुष्यातील दुःख आणि संघर्ष व्यक्त करण्यासाठी 'Marathi Sad Shayari On Life' हा शायरी संग्रह तयार केला आहे. या शायरीतून जीवनातील अडचणी, दुःखद प्रसंग शायरी स्वरूपात व्यक्त केले आहे. जीवनाच्या अनपेक्षित चढ-उतारांमुळे निर्माण झालेली निराशा आणि दुःख या शायरीतून व्यक्त करता येईल.
हरलो मी आयुष्याला
नशिबात दु:खच राहिले
तुझी आस होती प्रेमाची
पण… माझी ओंजळ रिकामीच राहिली
माझ्याशी बोलायचं नाहीए
ठिक आहे
पण एक लक्षात ठेव
तू अबोल राहिलेला
प्रत्येक दिवस
आपल्यातील अंतर अजून वाढवेल
मनातले सारे सांगण्यासाठी
समोर मनासारखा माणूस नाही
चालत नाही..
त्या माणसाला मन असावं लागतं
 |
Marathi Sad Shayari On Life |
चुका तेव्हाच दिसायला लागतात
जेव्हा समोरच्यावरील
प्रेम कमी व्हायला लागतं
खूप कठीण असतं
आपल मन दुखावलेलं असताना
समोच्याला मी बरा आहे असं सांगणं
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्रदयाची हाक लागते
 |
Marathi Sad Shayari On Life |
प्रेम हा मुळात आपला विषय नव्हता
मग त्यात पास होण्याचा विषयच नव्हता
असेल परवानगी तर मला होऊ दे व्यक्त
तुझ्याशिवाय मला आता राहता येणं आहे अशक्य
तू सोडलीस माझी साथ, पण कधी मागे वळून आलास तर
तुला कायम मी दिसेन थांबलेली आज
आयुष्याच्या वाटेवर खूप दु:ख आली
पण तुझ्यासारखे दु:ख कोणी दिले नाही
आता या दु:खाचीही सवय झाली…
पण साथ तुझी सोडवत नाही
 |
Marathi Sad Shayari On Life |
सगळ्यांसाठी मी आहे पण
माझ्यासाठी कोणीच नाही
सगळ्यांना मीच समजून घेऊ का
मला पण कोणीतरी समजून घ्याना
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते
आज खूप दिवसांनी मन
भरून रडावं वाटलं
मनातलं सार दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं
कारण कुणाला कितीही जीव लावा
कुणीच कोणाचं नसत
 |
Marathi Sad Shayari On Life |
इग्नोर करणे हा तर एक बहाणा असतो
प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात तुमची
गरज संपलेली असते
आयुष्यात खूप काही मिळत असत
पण आपण तर जे मिळाल नाही
तेच मोजत बसतो
माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा
आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो
जेव्हा माणसाला एकट राहायची सवय लागते
मग नंतर सोबत कोणी असो किंवा नसो
काही फरक पडत नाही
Marathi Sad Shayari Text
'Marathi Sad Shayari Text' हा शब्दांच्या माध्यमातून मनातल्या दुःखी भावनांना शायरी स्वरूपात मांडण्याचा योग्य मार्ग आहे. यामधील प्रत्येक ओळ मनाला भिडणारी आणि वेदनांना व्यक्त करणारी आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी हा संग्रह नक्कीच उपयोगी ठरेल.
जेव्हा विश्वास मोडलेला असतो तेव्हा
Sorry सुद्धा काहीच नाही करु शकत
आज माझ्याच सावलीला विचारलं
मी का चालते तू माझ्यासोबत
सावलीने पण हसत उत्तर दिलं
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर त्रो तेव्हा वाटतो जेव्हा
आपल्या बरोबर सर्व जण असतात
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला
आपल्या बरोबर हवी असते
 |
Marathi Sad Shayari Text |
जवळची नाती ही माणसाला कधी-कधी
खूप छळतात जितके जास्त जपाल तितके
आपल्याला आणखी दूर लोटतात
कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात हे स्वतःचा जीव
जपत रहा कारण जीव माझा तुझ्यात आहे
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस
 |
Marathi Sad Shayari Text
|
काय हवं होतं तिला,
मला कळलचं नाही,
घेऊन गेली हृदय,
पुढचं मला माहित नाही
खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो,
जे लोकं कधीच दुसऱ्यांना धोका
द्यायचा विचार पण करत नाही
का कधी कधी असं होत,
आपण ज्या व्यक्ती शिवाय एक
क्षणही राहू शकत नाही आणि
तिचं व्यक्ती आपल्या शिवाय खूप सुखी असते
 |
Marathi Sad Shayari Text
|
कधी-कधी सहन करण्यापेक्षा
सोडून देणंच योग्य असत
जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटेपणाची
दुरी कधीही चांगली असते आयुष्यात
बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहित असत
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो
कोणाला कधीच दोष देऊ नका
कारण तुम्हीच त्यांच्याकडून
जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या
 |
Marathi Sad Shayari Text
|
कोणावर इतकही जास्त प्रेम करू नये
की स्वतःच्या आयुष्यापेक्षा ती व्यक्ती
जास्त महत्वाची होईल
कोणाला कितीही द्या,
कुणाला किती ही जीव लावा,
कुठेतरी काहीतरी कमी पडतच
माझ्यात आणि तुझ्यात फरक इतकाच आहे
तू माझ्यासाठी सर्वकाही आणि
मी तुझ्यासाठी काहीच नाही
चालताना आज परत ठेच लागली
पुन्हा एकदा रस्ता चुकलाय
तुझा वाटेवरचा दगड सांगत होता
Marathi Sad Shayari Image
शब्दांप्रमाणेच Image स्वरूपात आपल्या दुःखद भावना व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच आम्ही 'Marathi Sad Shayari Image' हा संग्रह तयार केला आहे. ह्यातील हृदयस्पर्शी शायरी आकर्षक Image च्या माध्यमातून सादर करून ती अधिक प्रभावी ठरेल. हे Images सोशल मीडियावर शेअर करून तुम्ही तुमचं दुःख आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकता.
जगात जेवढी गर्दी वाढत चालली आहे
लोकं तेवढेच एकटे पडत चाललेत
तुटलेल्या नात्याचा विचार मनातून
काढून टाका कारण मेलेल्या फुलाला
पाणी देऊन काही उपयोग नाही
जेव्हा पण कोणावर प्रेम
करायचा विचार मनात येतो
तेव्हा पुन्हा हृदय तुटण्याची भीती वाटते
 |
Marathi Sad Shayari Image |
आजही डोळे ओले करू जातात
आयुष्यात काही क्षण असे असतात कि
त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते
ज्याची मस्करी करणार कुणी नसतं
त्याच्यावर प्रेम करणार ही कुणी नसत
तिला सवयच होती हृदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांशी खेळून
 |
Marathi Sad Shayari Image |
कुणास दुखावू नये गंमत म्हणून
बरंच काही गमवाव लागतं किंमत म्हणून
कुणीच कोणाच नसत असं
फक्त म्हणायचं असत
मनाच्या कोपऱ्यात मग
कुणासाठी तरी झुरायचं असत
वेळ अशी आहे कि जगण्याची
इच्छा नाही आणि मरणही येत नाही
 |
Marathi Sad Shayari Image |
तुझ्यावर नाही तुझ्या वेळेवर नाराज आहे
जो तू माझ्यासाठी देवू शकत नाही
एखाद्याला खूप जीव लावूनही तो
आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
तेव्हा आपल्या मनाला खुप वाईट वाटत
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की
समजाव माणुसकी अजूनही जिवंत आहे
कोसळणारा पाऊस पाहून मला
नेहमीच एक प्रश्न पडतो
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतोय
 |
Marathi Sad Shayari Image |
खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्याशिवाय जगू शकत नाही
असे म्हणणारेचं एक दिवस सोडून निघून जातात
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत
केल्याशिवाय काहीच मिळत नाही
अहो खरे काय ते मला विचारा ना
ह्या अश्रूंसाठी काहीच मेहनत करावी लागतं नाही हो
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.