नमस्कार,
माझे नाव ईश्वर वि. कदम आहे आणि मी एक ग्राफिक डिझायनर आहे. मी गेल्या 2 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. मला डिझायनिंगची खूप आवड आहे.
ही वेबसाइट बनवण्याचे माझे उद्दिष्ट फक्त डिझाईन-पुरते मर्यादित नाही तर माझे आणखी एक उद्दिष्ट आहे – लोकांना प्रेरित करणे.
आजच्या धावपळीच्या आणि धक्का-धक्कीच्या जीवनात अनेकजण तणावात पाहायला मिळतात. अशा लोकांना माझ्या Contents च्या माध्यमातून सकारात्मक विचार देऊन त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक हातभार लागावा आणि त्यांच्या रोजच्या जीवनातला ताण काही क्षणासाठी का होईना पण कमी व्हावा ह्या हेतूने मी ही वेबसाइट सुरू केली आहे, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या वेग-वेगळ्या Contents मधून सकारात्मकता आणि प्रेरणा देऊ शकेन.
येथे तुम्हाला प्रेरणादायी संदेश, प्रेम संदेश, आपल्या रोजच्या जीवनात एक सकारात्मक प्रेरणा घेऊन माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये ग्राफिक्स च्या माध्यमातून काही विचार, शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्रातील विविध सणांचे शुभेच्छा संदेश आपल्या मराठी भाषेतून पाहायला मिळतील.
माझ्या रोजच्या Contents च्या माध्यमातून तुम्हाला एका सकारात्मक विचारांशी जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. मला विश्वास आहे तुम्हाला ते नक्की आवडतील.
तुम्ही माझ्याशी सोशल मीडियाद्वारे देखील कनेक्ट होऊ शकता:
Youtube Channel - Marathi Wishes
मला आशा आहे की माझ्या या वेबसाइटवरून तुम्हाला प्रेरणा आणि सकारात्मकता मिळत राहील ज्याचा पुरेपूर फायदा आपल्या आयुष्यात करून घ्याल आणि हीच सकारात्मकता आपल्या मित्र मंडळींसोबत शेअर कराल.
धन्यवाद.
ईश्वर कदम.
मराठी Wishes संस्थापक.